Dharwad murder case: अपघात नव्हे; माजी आमदारपुत्राची हत्याच

पोलिस तपासात उघडकीस : एका महिलेसह तिघांना अटक
Dharwad murder case
Dharwad murder casePudhari
Published on
Updated on

धारवाड : बैलहोंगलचे माजी आमदार बाबूराव बोळशेट्टी यांचे पुत्र राजू बोळशेट्टी (वय 53) यांचा मृतदेह मंगळवारी (दि. 24) धारवाड तालुक्यातील रामापूर वनक्षेत्रात एका कारमध्ये जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून, हा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, धारवाड तालुक्यातील रामापूर गावात रेल्वे रुळालगतच्या घनदाट जंगलात राजू यांचा जळालेला मृतदेह सापडला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली होती. हा एक पूर्वनियोजित खून असल्याचा पोलिसांचा संशय होता. त्यादृष्टीने त्यांनी तपासाला सुरुवात केली होती. धारवाड ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपास करून एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. राजू यांनी संशयित महिलेला कर्ज स्वरूपात पैसे दिले होते. शारीरिक संबंधांवेळी राजू तिला पैसे देत असत. अशा प्रकारे त्यांनी दोन लाखांहून अधिक रुपये दिले होते. या पैशांवरून त्या महिलेचे आणि राजू यांचे संबंध बिघडले होते. सोमवारीही राजू यांनी त्या महिलेला भेटण्यासाठी मैदानावर बोलावले होते.

राजू यांच्या पैशाच्या तगाद्यामुळे ती महिला कंटाळली होती. त्यामुळे, तिने आपला मुलगा व प्रियकरासोबत खुनाचा कट आखला. संंबंधित ठिकाणी राजू यांचा खून करून या तिघांनी मृतदेह त्यांच्याच कारमधून रामापूरच्या जंगलात आणला. तो मागच्या सीटवर ठेवला. सोबत आणलेले 10 लिटर पेट्रोल ओतून कारला आग लावली. या घटनेनंतर तिघेही संशयित फरार झाले. मात्र, पोलिसांच्या जलद कारवाईमुळे काही तासांतच त्या तिघांना अटक करण्यात आली. या तपासाची माहिती पोलिसप्रमुख स्वतः पत्रकार परिषद घेऊन देणार असल्याने संशयितांची नावे देण्यात आली नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news