Priyank Kharge | मुख्यमंत्री, मंत्र्यांसह प्रत्येकाचे फोन टॅप

गृहमंत्री प्रियांक खर्गे यांचा आरोप; पेगाससच्या वापरावरून केंद्र सरकारवर निशाणा
Priyank Kharge |
Priyank Kharge | मुख्यमंत्री, मंत्र्यांसह प्रत्येकाचे फोन टॅप
Published on: 
Updated on: 

बंगळूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपला फोन टॅप केला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधत मुख्यमंत्री आणि मंत्र्यांसह प्रत्येकाचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप केला आहे. यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ माजला आहे.

मंत्री खर्गे म्हणाले, मुख्यमंत्री असोत किंवा इतर कोणतेही मंत्री प्रत्येकाचे फोन टॅप केले जात आहेत. खुद्द गृहमंत्री असलेल्या माझ्या फोनवरही पाळत ठेवली जात असल्याचा दावा त्यांनी केला. पेगासस स्पायवेअरची खरेदी आणि त्याच्या वापराबाबतही त्यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारले. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ही कार्यपद्धती म्हणजे गुजरात मॉडेल असल्याची टीकाही त्यांनी केली.

गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने कोणतीही ठोस कामगिरी केलेली नाही, असा आरोप करत खर्गे यांनी बेरोजगारी, चीन आणि पाकिस्तानसोबतचे संबंध यांसारख्या मुद्यांवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी विरोधी पक्षांना घाबरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले.

राज्याच्या राजकारणातही खळबळ

फोन टॅपिंग आणि पेगाससच्या वापरावरून पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. यापूर्वी खासदार गांधी यांनी केंद्रावर फोन टॅपिंगचा आरोप केला होता. त्यामुळे देशभरात जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर राज्यातील काँग्रेस नेत्यांचेही फोन टॅपिंग होत असल्याचा आरोप केल्याने राज्याच्या राजकारणातही खळबळ माजली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.