बेळगाव : सातपैकी दोन गुन्ह्यांत अकरा जण निर्दोष

शिवपुतळा विटंबनाविरोधात आंदोलनप्रकरणी न्यायालयाचा निकाल
Belgaon News
बेळगाव ः निर्दोष मुक्तता झालेल्यांसोबत अ‍ॅड. श्यामसुंदर पत्तार, अ‍ॅड महेश बिर्जे आदी.Pudhari Photo
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बंगळूर येथील शिवपुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍या कार्यकर्त्यांविरुद्ध दगडफेक करून शांतता भंग करण्यासह इतर गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे पोलिसांनी दाखल केले होते. मात्र, ते गुन्हे न्यायालयात सिद्ध करता न आल्याने सातपैकी दोन गुन्ह्यांतून अकरा जणांची तृतीय जेएमएफसी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. रमाकांत कोंडुसकर, शुभम शेळके, प्रकाश शिरोळकर, सरिता पाटील, भारत मेणसे, नरेश निलजकर, अंकुश केसरकर, लोकनाथ उर्फ लोकेश रजपूत, हरिश मुतगेकर, विनायक कंग्राळकर, मदन बामने अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत.

Belgaon News
महायुतीचे सरकार शिवद्रोही; शिवपुतळा दुर्घटनेवरून पवार, ठाकरेंचा हल्लाबोल

2021 मध्ये बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटबंना करण्यात आल्यानंतर या घटनेच्या निषेधार्थ धर्मवीर संभाजी चौकात शिवप्रेमी, समिती नेेते व कार्यकर्त्यांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. यावेळी प्रक्षोभक भाषण केल्याने दगडफेक होऊन शांतता भंग केल्याचा ठपका ठेवत खडेबाजार, कॅम्प, मार्केट पोलिसांत कार्यकर्त्यांविरुद्ध पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला राज्यद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता; पण तो मागे घेण्यात आला. खडेबाजार पोलिस स्थानकात दाखल दोन्ही खटल्यांत अकरा जणांवर गुन्हा सिद्ध न झाल्याने जेएमएफसी तृतीय न्यायालयाने अकरा जणांची निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्यावतीने अ‍ॅड. श्यामसुंदर पत्तार, अ‍ॅड. महेश बिर्जे, अ‍ॅड. हेमराज बेंचन्नावर, अ‍ॅड. वैभव कुट्रे, अ‍ॅड. बाळासाहेब कागणकर यांनी काम पाहिले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news