Brother Murder Case | मोठ्या भावाकडून धाकट्याचा खून

अंकलगीत शेतजमीन विक्रीतून वाद; हल्लेखोराला अटक
Brother Murder Case |
Brother Murder Case | मोठ्या भावाकडून धाकट्याचा खून
Published on
Updated on

बेळगाव : शेती विक्रीच्या चर्चेवेळी झालेल्या वादातून मोठ्या भावाने धाकट्याचा खून केल्याची घटना अंकलगी यथे घडली. राजू सिद्धाप्पा रूद्राप्पागोळ (वय ४५, मूळ रा. घोडगेरी, ता. हुक्केरी, सध्या रा. अंकलगी, ता. गोकाक) असे मृत भावाचे नाव आहे. या प्रकरणी अंकलगी पोलिसांनी संजू सिद्धाप्पा रूद्राप्पागोळ (वय ४९, रा. घोडगेरी, ता. हुक्केरी, सध्या रा. अंकलगी) याला अटक केली.

याबाबत माहिती अशी की, या दोघा भावांमध्ये शेतजमिनीच्या विक्रीतून वाद होता. दोघेही सध्या अंकलगी येथेच राहतात. २४ रोजी रात्री आठ ते दहाच्या सुमारास घोडगेरी येथील शेतजमीन विकण्यासंबंधीची दोघांमध्ये चर्चा सुरू होती. परंतु, यातून दोघांमध्ये वाद सुरू झाला. रागाच्या भरात संजूने राजूच्या डोक्यात दगडाने वार केला. यानंतर गळा आवळून त्याचा खून केला. मृताचा मामा बाळप्पा काडप्पा मठगार (रा. सुलधाळ, ता. गोकाक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या प्रकरणाची अंकलगी पोलिसांत नोंद झाली होती. गोकाकचे पोलिस निरीक्षक सुरेशबाबू आर. बी. व त्यांच्या सहकाऱ्यांनी याचा तपास करत भावाला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news