Belgaum Accident: भरधाव दुचाकीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

गेल्या आठवड्यात भरधाव दुचाकीने धडक दिल्याने जखमी झालेल्या वृद्धाचा दुसऱ्या दिवशी उपचार सुरु असताना मृत्यू झाला
Accident
Accident
Published on
Updated on

बेळगाव : गेल्या आठवड्यात भरधाव दुचाकीने धडक दिल्याने जखमी झालेल्या वृद्धाचा दुसऱ्या दिवशी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. विजय कांबळे (वय ६५) असे त्यांचे नाव असून त्यांचा पत्ता व नातेवाईकांची माहिती मिळत नसल्याने रहदारी पोलिसांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे.

मंगळवारी (दि. ७) रात्री ८.३० च्या सुमारास सीबीटीजवळ हा अपघात झाला होता. मंगळवारी सर्किट हाऊससमोरून जुन्या भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सीबीटीतून बाहेर पडणाऱ्या रस्त्याने कांबळे रस्ता ओलांडत होते. यावेळी जुन्या भाजी मार्केटकडे तिघेजण दुचाकीवरुन जात होते. या भरधाव दुचाकीची सदर वृद्धाला जोराची धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोकीला दुखापत झाल्याने याच दिवशी त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचाराचा उपयोग न होता दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. ८) त्यांचा मृत्यू झाला.

या वृद्धाची उंची ५.४ फूट, अंगाने सदृढ, गोल चेहरा, मोठे नाक, गव्हाळ रंग आहे. त्यांचे अंदाजे वय ६५ वर्षे असून डोकीवर अर्धा इंची पांढरे केस आहेत. अंगावर राखट व पांढरा लाईनिंग शर्ट, पांढरे बनियन, राखट रंगाची पॅन्ट व काळा बेल्ट आहे. या व्यक्तीबाबत कुणाला माहिती असल्यास त्यांनी रहदारी उत्तर विभाग पोलिस ठाण्याशी ०८३१-२४०५२४० अथवा ९४८०८०४१०३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news