

निपाणी : निपाणी येथील तंवदी घाटाच्या उतारावर एक विचित्र अपघात रविवारी (दि.15) घडला. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर चार ट्रक, तीन कार व एक दुचाकी अशी आठ वाहने एका पाठोपाठ वाहनांना धडकली. या विचित्र अपघातात एका महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला.
यामध्ये जबीन महंमदहुसेन मकानदार (वय 58 रा. दर्गा गल्ली निपाणी) आणि संतोष गणपती माने (वय 50 रा.भोज) अशी मयतांची नावे आहेत. तर 11 जण जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये ट्रक, कार आणि दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. तर जखमी पट्टणकडोली, निपाणी, गडहिंग्लज, हुबळी येथील आहेत. घटनास्थळी निपाणी शहर पोलीसांनी भेट देऊन तपास घटनेची माहिती घेतली.