E-KYC: ई-केवायसीसाठी ३० जूनची मुदत अन्यथा गॅस वितरण बंद

अद्याप काही ग्राहकांनी प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याने गॅस पुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी या प्रक्रियेवर कंपन्याने भर देण्यास प्रारंभ केला आहे
KYC
KYCPudhari
Published on
Updated on

बेळगाव : शहरात घरगुती गॅस पुरवठा २५ दिवस, तर ग्रामीण भागात ४५ दिवसानंतर घरगुती गॅस पुरवठा केला जात आहे. या पुरवठ्यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ग्राहकाची ओळख अर्थात्‌ केवायसी अनिवार्य केले असून ३० जूनच्या आत ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. अन्यथा गॅस पुरवठा बंद केला जाईल, असा इशारा गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्याने ग्राहकांना दिला आहे.

शहर व ग्रामीण भागात गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना केवायसी करून घ्यावी, अशी कल्पना यापूर्वी दिली आहे. मात्र अद्याप काही ग्राहकांनी प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याने गॅस पुरवठ्यात पारदर्शकता आणण्यासाठी या प्रक्रियेवर कंपन्याने भर देण्यास प्रारंभ केला आहे.

सध्या गॅस सिलेंडर वापरत असलेल्या ग्राहकांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. केवायसी न झालेल्या ग्राहकांचा विचार गॅस सिलेंडर पुरवठा बंद केला जाईल. याची ग्राहकानी नोंद घ्यावी. असे गॅस पुरवठा करणाऱ्या शहरातील कंपन्यानी पत्रक काढून कळवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news