CM D. K. Shivakumar | ...तर पान मसाला, गुटख्यावर बंदी

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार; मादक पदार्थ मिसळले जात असल्याच्या तक्रारी
CM D. K. Shivakumar
CM D. K. Shivakumar
Published on
Updated on

बंगळूर : अल्प प्रमाणात मादक पदार्थ मिसळलेल्या पान मसाल्यासह सुपारीचे उत्पादन व गुटखा विक्रीवर राज्यात बंदी घालण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिला आहे. येथे आयोजित ‘ड्रग्स फ्री इंडिया' अभियानात ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिवकुमार म्हणाले, पान मसाला, गुटखा, सुपारी व इतर तत्सम पदार्थांमध्ये मादक पदार्थ मिसळून त्यांची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हे खरे असेल, तर तत्काळ हा प्रकार राज्यात थांबवून विक्रीवर बंदी घातली जाईल. आमचे ध्येय अमली पदार्थमुक्त कर्नाटक निर्माण करणे असून त्या माध्यमातूनच आजच्या अमली पदार्थमुक्त भारत कार्यक्रमासाठी आपण जमलो आहोत. अमली पदार्थांच्या व्यसनाला रोखणे एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून तरुण पिढीला या व्यसनाच्या जाळ्यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे त्यांनी सांगितले. राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे देशातील सर्वात मोठे आरोग्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाने सर्वाधिक डॉक्टर घडविले आहेत, असे मुख्यमंत्री शिवकुमार नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news