

बंगळूर : राज्यातील हमी योजनांमुळे आम्हाला खऱ्या अर्थाने मदत झाली आहे. तसेच राज्य सरकारने लोकांच्या अडचणींना योग्य प्रतिसादही दिला आहे. त्यामुळेच पक्षाला दावणगिरी व बागलकोट पोटनिवडणुकांमध्ये यश मिळाले आहे. तर केरळमध्ये काँग्रेस पक्ष सत्तेवर येईल हा विश्वास होताच असे मत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केले आहे. ते सोमवारी ( दि. ४) पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंतरी शिवकुमार यांनी दावणगिरी येथे मोठ्या फरकाने विजय मिळणार नाही. पण आपला उमेदवार विजयी होणार याची खात्री होती. एसडीपीआय हा एक आमच्यासाठी धोकादायक पक्ष असून एसडीपीआयला हलक्यात घेतले नाही. तो सुद्धा एक राजकीय पक्ष आहे. त्यांनी अल्पसंख्याकांची मते घेतली असल्याचे म्हटले आहे.
केरळ निकालांवरून हे दिसून आले आहे की जनतेला बदल हवा आहे. आम्ही प्रचारासाठी गेलो तेंव्हाही लोक आमच्यावर विश्वास व्यक्त करत होते. तामिळनाडूतील निकालांवर भाष्य करताना ते म्हणाले की, तामिळनाडूतील निकाल आश्चर्यकारक आहेत. तिथे एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. आम्ही जनतेची नाडी ओळखण्यास कमी पडलो. दरम्यान उपस्थित पत्रकारांनी त्यांच्या सेलिब्रिटी स्टेटसमुळे जनतेने मतदान केले का? असा सवाल केल्यावर उपमुख्यमंतऱ्यानी आम्हाला वाटले होते की त्यांना ३०-४० टक्के मते मिळतील. पण त्यांना त्यापेक्षा जास्त मते मिळाली आहेत.
तसेच आसाम राज्यातील निवडणुकांवर भाष्य करताना शिवकुमार यांनी आम्हाला वाटले होते की आम्हाला ५० ते ६० जागा सहज मिळतील. तसे तिथल्या स्थानिक नेत्यांनीही आम्ही ५० जागांपर्यंत आरामत पोहोचू असे म्हटले होते. पण अपेक्षित यश मिळाले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान पश्चिम बंगालबद्दल बोलताना त्यांनी तिथे सत्तेचा पद्धतशीर गैरवापर झाला आहे. त्यांनी निवडणूक आयोगाचा शक्य तितका गैरवापर केला आहे. त्यांनी पूर्वी खूप प्रयत्न केले. आता बदल झाला आहे, कारण दोन लाखांहून अधिक मते रद्द करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.