DK Shivakumar: मुख्यमंत्री असलो, तरी तुमचा सेवकच

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार : पहिल्यांदाच मतदारसंघाचा दौरा; जल्लोषी स्वागत
DK Shivakumar: मुख्यमंत्री असलो, तरी तुमचा सेवकच
Published on
Updated on

बंगळूर : मी मुख्यमंत्री असलो, तरी तुमचा सेवक आहे. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानेच मी यशस्वी झालो आहे. तुमची कोणतीही समस्या असो, माझे दरवाजे तुमच्यासाठी सदैव उघडे आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.

मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या कनकपुरा मतदारसंघातील हारोहळ्ळी येथे आलेल्या डी. के. शिवकुमार यांचे रविवारी (दि. ७) जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, गेल्या ४० वर्षांत मला ज्या लोकांनी राजकीयदृष्ट्या घडवले, त्यांचे आभार मानणे हे माझे कर्तव्य आहे. याठिकाणच्या लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आपण स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बंगळूर दक्षिण जिल्हा जाहीर करण्याचा निर्णय ऐतिहासिक होता. नाव बदलल्यामुळे तुमच्या जमिनींचे भाव वाढले. काही लोकांनी या जिल्ह्याच्या निर्मितीला विरोध केला होता. पण, आता सर्वांनाच नाव बदलण्याचे महत्त्व समजले आहे. हारोहळ्ळीच्या विकासासाठी मी स्वतंत्र बैठक घेईन. आम्ही लवकरच कनकपुरा येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी पायाभरणी करू. याचा फायदा तुमकूर आणि बंगळूर ग्रामीण भागातील लोकांनाही होईल. येथील लोकांना बंगळूरकडे स्थलांतर करण्यापासून आम्ही रोखू. आम्ही येथे उत्तम शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री शिवकुमार यांनी दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news