Suraj Hegde | काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सूरज हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Suraj Hegde |
Suraj Hegde | काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सूरज हेगडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Published on
Updated on

बंगळूर : काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि कर्नाटक सरकारच्या गॅरंटी कमिटीचे उपाध्यक्ष सूरज हेगडे यांचे रविवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. बंगळूरमधील एम. एस. रामय्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

सूरज हेगडे हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांचे नातू होते. त्यांनी भारतीय युवक काँग्रेसचे प्रभारी आणि कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. त्यांच्या निधनावर काँग्रेसच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील अनेक वरिष्ठ नेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. मंगळवारी हेब्बाळ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

माझ्या कुटुंबातील सदस्य गमावला : मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सूरज यांच्या आठवणींना उजाळा देत म्हटले, सूरज माझ्या कुटुंबाच्या खूप जवळ होते. मी त्यांना त्यांच्या तरुणपणापासून पाहिले आहे. देवराज अर्स यांचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे चालवला. कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, प्रियांका गांधी आणि इतर वरिष्ठ नेत्यांनीही हेगडे यांना श्रद्धांजली वाहिली. सूरज हेगडे यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलित, मागासवर्गीय आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी समर्पित केले होते.

पक्ष संघटनेसाठी न भरून निघणारे नुकसान : राहुल गांधी

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, सूरज हेगडे यांच्या निधनाने मला अत्यंत दुःख झाले आहे. युवक काँग्रेस त्यांच्यासाठी केवळ एक जबाबदारी नव्हती, तर त्यांनी अनेक तरुण कार्यकर्त्यांना घडवले जे आज लोकशाही आणि न्यायासाठी लढत आहेत. त्यांचे जाणे काँग्रेस परिवाराचे न भरून निघणारे नुकसान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news