

बंगळूर : एलपीजी दरातील वाढीबाबत अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. तसेच, औद्योगिक गॅस आणि औद्योगिक डिझेलच्या दरांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी रविवारी (दि. ७) पत्रकारांशी बोलताना दिली.
केंद्र सरकारने १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे. जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढत असल्याने सरकारी तेल विपणन कंपन्यांवर दबाव निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी दरवाढ आहे.
मला एलपीजी दरातील वाढीबाबत माहिती मिळाली आहे. औद्योगिक गॅस आणि औद्योगिक डिझेलचे दर तर त्याहून अधिक चिंताजनकरीत्या वाढले आहेत. मी याबद्दलचा अहवाल घेत आहे आणि उद्या या विषयावर बोलेन, असे त्यांनी स्पष्ट केले.