Chikodi Accident: दोन बसेसच्या स्पर्धेत कारला धडक

देवदर्शनाहून परतताना अपघात : चिकोडीजवळ चालक जखमी
Chikodi Accident: दोन बसेसच्या स्पर्धेत कारला धडक
Published on
Updated on

चिकोडी : चिकोडीहून बेळगावकडे जाणाऱ्या कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसेस भरधाव वेगाने जात असताना, तू पुढे की, मी या स्पर्धेत एका बसने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. त्यात कारचालक जखमी झाला आहे. तो देवर्शनाहून परत जात असताना हा अपघात घडला.

सुदीप मोरे (रा. धाराशीव, महाराष्ट्र) असे जखमी कारचालकाचे नाव आहे. ते रेडी गणपतीचे दर्शन घेऊन बेळगाव-चिकोडीमार्गे धाराशीवला जात होते. कार चिकोडीनजीकच्या जैनापुर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आली असता बसने त्यांना धडक दिली.

दोन्ही बसचा वेग इतका होता की अपघात स्थळापासून 100 मीटर लांब या दोन्ही एसटी गाड्या जाऊन थांबल्या. सुदीप यांना कन्नड येत नसल्याने त्यांची मोठी पंचायत झाली. एसटी चालकांची चूक असतानादेखील कारचालकाची चूक असल्याचे एसटीचे चालक सांगत होते. कारचालकाने खड्डा चुकविण्यास जाऊन आपल्याला धडक दिली, असे एसटी चालकांनी सांगितले.

तथापि, सुदीप मोरे दैनिक पुढारीशी बोलताना म्हणाले, मी माझ्याच बाजूने जात असताना समोरून येणाऱ्या दोन्ही बसेस भरधाव होत्या. एकमेकांची साईड काढण्यास जाऊन एका बसने कारला समोरून धडक दिली. पोलिसांनी मला न्याय मिळवून द्यावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news