Karnataka Road Accident: ट्रक-दुचाकीच्या अपघातात दोघे ठार

चिकोडी-निपाणी मार्गावर चिंचणी टोल नाक्यानजीक घटना
Accident
Accident
Published on
Updated on

चिकोडी : ट्रक व दुचाकीच्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाल्याची घटना चिकोडी-निपाणी राज्यमार्गावरील चिंचणी टोल नाक्यानजीक शनिवारी (दि. २७) घडली. सिदू कुरळे व स्वरूप माळवदे (रा.ओतारी गल्ली, चिकोडी) असे ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

याबद्दल अधिक माहिती अशी, चिकोडी येथील हे तरुण काम संपवून घरी चिकोडीकडे दुचाकीवरून जात होते. टोल नाक्यानजीक चिकोडीकडे जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोराने दुचाकी धडकली. यानंतर दुचाकी रस्‍त्‍यावर पडल्‍याने दोघांच्‍या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांचाही जागीच मृत्‍यू झाला. यावेळी रस्‍त्‍यावर गर्दी झाल्‍याने काही वेळ वाहतूक ठप्‍प झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news