Chief Minister D. K. Shivakumar | म्हादईसह प्रलंबित प्रकल्पांसाठी जोर लावणार : मुख्यमंत्री शिवकुमार

दिल्लीत कर्नाटकातील सर्वपक्षीय खासदारांशी चर्चा
नवी दिल्ली : कर्नाटक भवनात आयोजित बैठकीत बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार. शेजारी उपस्थित मंत्री, खासदार, अधिकारी.
नवी दिल्ली : कर्नाटक भवनात आयोजित बैठकीत बोलताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार. शेजारी उपस्थित मंत्री, खासदार, अधिकारी.
Published on
Updated on

बंगळूर : राज्यातील म्हादई, मकेदाटू प्रकल्पांची सद्य:स्थिती, धरणातील पाणीसाठा, दुष्काळी परिस्थिती याबाबत नवी दिल्लीतील कर्नाटक भवनात सोमवारी (दि. २७) बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत चर्चा करून प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जोर लावण्याचे ठरले.

म्हादई आणि मकेदाटू योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. याबाबत न्यायालयात सुरू असणाऱ्या कामकाजाची माहिती देत पाणीप्रश्न सुटण्यासाठी यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्याला भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राबरोबर चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले. योजना राबविण्यात येणारे अडसर दूर करण्याचे सूचविण्यात आले. बैठकीला मंत्री रामलिंगा रेड्डी, दिल्लीतील कर्नाटकचे विशेष प्रतिनिधी टी. बी. जयचंद्र, ॲडव्होकेट जनरल शशिकिरण शेट्टी, अप्पर मुख्य सचिव गौरव गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव नकुल, तांत्रिक सल्लागार जयप्रकाश यांच्यासह कायदे व पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news