Konkan Railway: कोकण रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

सुरक्षित रेल्वे संचालन सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्वे विभागावर मान्सूनच्या वेगावरील निर्बंधांनुसार विविध स्थानकांवर गाड्यांच्या वेळेचे नियमन केले जाईल
Railway
Railway Pudhari
Published on
Updated on

कारवार : कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने १५ ते २० जून या काळात कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या पाच गाड्यांच्या वेळापत्रकात अंशतः बदल केला आहे. या कालावधीत सुरक्षित रेल्वे संचालन सुनिश्चित करण्यासाठी कोकण रेल्वे विभागावर मान्सूनच्या वेगावरील निर्बंधांनुसार विविध स्थानकांवर गाड्यांच्या वेळेचे नियमन केले जाईल.

रोज धावणारी रेल्वे (क्र. १६५९५/१६५९६) बंगळूर-कारवार-बंगळूर एक्सप्रेस, रेल्वे (क्र. १६५८५/१६५८६) बंगळूर-मुर्डेश्वर-बंगळूर, त्रैसाप्तहिक रेल्वे (क्र. १६५१५/१६५१६) यशवंतपूर एक्सप्रेस, रेल्वे (क्र. १२७४१/१२७४२)साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस वास्को द गामा-पाटणा-वास्को द गामा, रेल्वे (क्र. ११०९७/११०९८) पुणे-एर्नाकुलम-पुणे साप्ताहिक एक्सप्रेस या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news