

बेळगाव : धावत्या कारच्या इंजिनमध्ये आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. मंगळवारी (दि. 1) सायंकाळी साडेसातच्या सुमारास खानापूर-बेळगाव रोडवरील मच्छेतील संगोळ्ळी रायण्णा चौकाजवळ ही घटना घडली.
कार खानापूरहून बेळगावला येत होती. मच्छेजवळ येताच कारच्या इंजिनमधून अचानक धूर येऊ लागला. कार काही मीटरवर गेल्यानंतर अचानक आग लागली. यावेळी कारमध्ये चार ते पाच तरुण होते. कार थांबवून ते लगेच बाहेर पडले. घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन आग आटोक्यात आणली. कारच्या इंजिनजवळील भाग वगळता अन्यत्र कुठेही कारचे नुकसान झालेले नाही. रात्री उशिरापर्यंत याची नोंद नसल्याने अधिक तपशील समजू शकला नाही.