

बेळगाव : ऊस उत्पादक शेतकरी उसाला हमीभाव जाहीर मागणी करत आहेत. गत सात दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना वेळ नाही. आपली खुर्ची कशी शाबित ठेवायची, याकडे त्यांचे लक्ष आहे. सध्याच्या सरकारमध्येच सत्ता संघर्ष सुरू असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजेंद्र यांनी सांगितले. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जिल्ह्यातील ऊस उत्पादक मुडलगी तालुक्यातील गुर्लापूर क्रॉसजवळ आंदोलन करत आहे. या ठिकाणी भेट देण्यासाठी बी. वाय. विजयेंद्र मंगळवारी (दि. 4) बेळगावात दाखल झाले आहेत.
विजयेंद्र म्हणाले, काही कारखानदरांनी 3,200 रुपये दर जाहीर केला आहे. मात्र, तो दर शेतकर्यांना मान्य नाही. पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकर्यांना नुकसानभरपाई दिली नाही. शेतकरी अडचणीत आहे. पावसामुळे हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. उसाला हमीभाव दिला जात नाही. शेतकर्यांना मदत न करणे हे सरकारचे अपयश आहे. सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. तरीही सरकार शेतकर्यांच्या प्रश्नांकडे डोळेझाक करत आहे.
यावेळी आमदार अभय पाटील, माजी आमदार अॅड. अनिल बेनके, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.