

बेळगाव : बेळगाव-गोकाक रोडवरील अष्टे- मुचंडी गावाजवळ धावत्या कारला आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. या कारमधील सर्वजण तातडीने बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
बेळगावकडून गोकाककडे जात असलेल्या कारला शॉर्टसर्किट्ने अचानक आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररूप धारण केले. कारमधील सर्वजण तातडीने बाहेर पडल्याने कोणालाही दुखापत झाली आहे. तातडीने अग्निशामक दलाला याची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली. या घटनेमुळे या रस्त्यावरील वाहतूक काहीवेळ थांबवण्यात आली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती.