Belgaum Burglary | अमननगरमध्ये घरफोडी; मौल्यवान वस्तू लंपास

बेळगाव : घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस.
बेळगाव : घटनास्थळी पंचनामा करताना पोलिस.
Published on: 
Updated on: 

बेळगाव : अमननगर येथील एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू लंपास केल्याची घटना सोमवारी (दि. १६) उघडकीस आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्यात आली नसल्याने नेमका किती ऐवज चोरीला गेला याची माहिती मिळू शकली नाही.

अमननगरमधील संबंधित घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील साहित्य विस्कटून व शोधाशोध करून सोन्या-चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारण्यात आला. ही घटना निदर्शनास आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने माळमारुती पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर लागलीच माळमारुती पोलिसांचे अधिकारी व श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. श्वानपथकाच्या मदतीने चोरट्यांचा माग काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलिसांत अधिकृत फिर्याद दाखल झाली नव्हती. त्यामुळे चोरीला गेलेल्या दागिन्यांची नेमकी संख्या, वजन आणि किंमत समजू शकली नाही. माळमारुती पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.