बंगला फोडून 70 तोळे सोने लंपास, गोकाकमधील घटना

बंगला फोडून 70 तोळे सोने लंपास, गोकाकमधील घटना
Belgaum news
बंगला फोडून 70 तोळे सोने लंपास, गोकाकमधील घटनाpudhari photo
Published on
Updated on

बेळगाव, गोकाक ः पहाटेच्या सुमारास बंगल्याचे कुलूप तोडून तब्बल 70 तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. गोकाकमधील विद्यानगर येथे हा चोरीचा प्रकार घडला असून, या प्रकरणी घरमालक श्रीराम चौधरी यांनी गोकाक शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, चौधरी हे आपल्या कुटुंबीयांसह परगावी गेले होते. बंद घर पाहून चोरट्यांनी बुधवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास घराचे समोरील कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटात शोधाशोध केल्यानंतर त्यांच्या हाती 70 तोळे सोन्याचे दागिने लागले. ते घेऊन त्यांनी पोचारा केला. या घरात चोरीपुर्वी चोरटघांनी बाजूच्या अन्य एका घरातही चोरीसाठी प्रवेश केला होता. परंतु, तेथे काहीच हाती लागले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच गोकाक शहरचे पोलीस निरीक्षक सुरेशबाबू बंडीवडर, उपनिरीक्षक के, वालीकर यांनी सहकान्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. घटनेनंतर ठसेतरज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतु, चोरट्यांचा माग निघाला नाही.

सीसीटीव्हीकडे दुर्लक्ष

वाढत्या चोर्‍यांचे प्रमाण लक्षात घेऊन गोकाक शहर पोलिस अधिकार्‍यांनी घरमालकांना सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन केले होते. तथापि, चौधरी हे मोठे व्यापारी असून, त्यांनाही सीसीटीव्ही बसविण्याची सूचना केली होती. परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. येथे फार वर्दळ नसल्याने घरोघरी सीसीटीव्ही बसवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news