येडिंविरुद्ध आरोपपत्र दाखल

पोक्सोप्रकरणी सीआयडीची कारवाई
B. S. Yeddyurappa
येडिंविरुद्ध आरोपपत्र दाखलPudhari File Photo

बंगळूर : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुराप्पा यांच्याविरुद्ध पोक्सोप्रकरणी सीआयडीने गुरुवारी (27 जून) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.

B. S. Yeddyurappa
आम्‍ही पहिल्‍यापेक्षा तीनपट अधिक मेहनत करणार : पंतप्रधान मोदी

मदत मागण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याविरुद्ध पीडितेच्या आईने सदाशिवनगर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी येडियुराप्पांविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तपास सीआयडीकडे सोपवला होता. सरकारी वकील अ‍ॅड. अशोक नाईक यांनी पोक्सो विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्याची माहिती दिली. या प्रकरणात येडियुराप्पांसह चौघांविरुद्ध पोक्सो व भारतीय दंड विधानाअंतर्गत आरोपपत्र दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. येडियुराप्पा यांनी सदर महिलेशी जुन्या प्रकरणाबद्दल बोलताना तिच्या अल्पवयीन मुलीला खोलीत नेले. तिच्याशी अनुचित वर्तन केले. मुलीने विरोध केल्यानंतर तिला पैसे देऊन त्यांनी पाठवले, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

B. S. Yeddyurappa
पंतप्रधान मोदी जनादेश नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत : मल्लिकार्जुन खर्गे

सदर महिलेने घडलेल्या घटनेची माहिती आणि व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. सदर पोस्ट काढून टाकण्यासाठी तिघांनी त्यांच्यावर दबाव आणला होता. वाय. एम. अरुण, एम. रुद्रेश आणि जी. मरिस्वामी यांनी महिलेला बोलावून आपल्या समोर सोशल मीडियावरील पोस्ट काढून टाकण्यास भाग पाडले होते. त्या तिघांची नावेही आरोपपत्रामध्ये आहेत. महिलेने गेल्या फेब्रुवारीमध्ये आपल्या 17 वर्षीय मुलीवर येडियुराप्पांनी लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. याबाबत तक्रार दाखल करुन पोलिसांनी तपास सुरु केला होता. त्यानंतर प्रकरण सीआयडीकडे सोपवले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news