

बेळगाव : बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त म्हणून भूषण गुलाबराव बोरसे यांची नियुक्ती झाली आहे. बेळगावचे विद्यमान पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांची यांची अचानक बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
भूषण बोरसे हे सध्या बंगळूर सीईएन विभागात आईजीपी पदावर कार्यरत आहेत. त्यांची बेळगावचे पोलिस आयुक्त म्हणून बदली झाली आहे. पोलिस आयुक्त मार्बन्यांग हे सध्या बेळगावचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. संतीबस्तवाड प्रकरण शिवाय अन्य काही प्रकरणांमुळे ते सध्या चर्चेत आहेत. त्यांची बदली होणार, अशी चर्चा होती. यावर आता शिक्कामोर्तब झाले असून त्यांची बदली झाली आहे. परंतु, त्यांची कुठे बदली केली आहे याबाबत राज्य पोलिस खात्याने अद्याप माहिती दिलेली नाही. परंतु, त्यांच्या जागी बोरसे नियुक्त होणार असल्याचा आदेश पोलिस खात्याने जारी केला आहे. ते लवकरच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील, असे सूत्रांनी सांगितले.