Bengluru MLA kidnapping case: माजी आमदाराचे अपहरण; 2 कोटींची मागणी

बंगळूरमधील घटना; रक्कम देण्याचे मान्य केल्यानंतर सुटका
kidnapping case
kidnapping casePudhari Photo
Published on
Updated on

बंगळूर : बंगळूरमधील अनेकलजवळ माजी विधान परिषद सदस्य दयानंद रेड्डी यांचे सोमवारी (दि. १) रात्री उशिरा अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी तब्बल तीन कोटी रुपयांची मागणी केली. अखेर दोन कोटी रुपये देण्याचे मान्य केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

माजी आमदार रेड्डी सोमवारी रात्री सुमारे सव्वाबारा वाजता गोल्ड कॉइन क्लबमधून बाहेर पडून घरी निघाले होते. त्यावेळी हिलाली गावाजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी रेड्डी यांची गाडी थांबवली. एक भेटवस्तू आल्याचे सांगून त्यांना एक पेटी दाखवली. गाडीचा दरवाजा उघडताच एकटा गाडीत शिरला. त्याने रेड्डी यांच्यावर बंदूक रोखली आणि आपण सांगितलेल्या दिशेने गाडी चालवण्यास सांगितले.

त्याचवेळी, दुसरे दोघेजण एका लाल रंगाच्या गाडीतून त्यांचा पाठलाग करु लागले. त्यानंतर ते रेड्डी यांना अत्तिबेले केएचबी लेआऊटजवळ घेऊन गेले. तिथे त्यांनी त्यांना धमकी दिली. त्यांनी रेड्डी यांना जीवे मारण्यासाठी १० कोटी रुपयांची सुपारी घेतल्याचे सांगितले. त्यांच्या गळ्याला बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिली.

रेड्डी यांनी पैसे देण्याचे कबूल केले. अपहरणकर्त्यांनी सुरुवातीला ३ कोटी रुपयांची मागणी केली होती. पण, नंतर ते २ कोटी रुपयांवर राजी झाले. सध्या पैसे नसल्याने रेड्डी यांनी सकाळी बँक उघडल्यावर पैसे देतो, असे सांगितले. संशयितांना त्यांना पैसे काढल्यानंतर फोन करण्यास सांगून त्यांना सोडून दिले.

logo
Pudhari News
pudhari.news