Bengaluru drug seizure: बंगळूरमध्ये 23.6 कोटींचे अमली पदार्थ जप्त

बंगळूर महानगर पोलिसांनी गुरुवारी (दि. 16) केलेल्या कारवाईत सुमारे 23.6 कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले
Drugs Seized
Drugs SeizedPudhari
Published on
Updated on

बंगळूर : बंगळूर महानगर पोलिसांनी गुरुवारी (दि. 16) केलेल्या कारवाईत सुमारे 23.6 कोटी रुपये किंमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी चार परदेशी नागरिकांसह एकूण दहाजणांना अटक करण्यात आली आहे.

त्यात परराज्यातीलही काहीजणांचा समावेश आहे. शहरातील नामांकित महाविद्यालयांतील विद्यार्थी, आयटी-बीटी कर्मचारी व श्रीमंत तरुणांना लक्ष्य करून ते अमली पदार्थांची विक्री करत होते. गेल्या काही आठवड्यांपासून येलहंका न्यू टाऊन, डीजे गल़्ली, बनसवाडी, कोरमंगल, बोम्मनगल्ली, व पुलिकेशी हद्दीत कारवाया करण्यात आल्या आहेत. अटक केलेल्या दहाजणांपैकी चार परदेशी, दोन स्थानिक व चारजण राज्याबाहेरील आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news