DGP Ramchandra Rao: मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून डीजीपी राव यांचे निलंबन मागे

गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांची माहिती
DGP Ramchandra Rao
DGP Ramchandra Rao
Published on
Updated on

बंगळूर : डीजीपी रामचंद्र राव यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी घेतला आहे, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी गुरुवारी (दि. ७) दिली. ते बंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा विभागाने डीजीपी रामचंद्र राव यांचे निलंबन मागे घेतले आहे. राव या महिन्याच्या अखेरीस निवृत्त होत असल्याने मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने हा निर्णय घेण्यात आला आहे. निलंबन मागे घेण्याचा निर्णय योग्य होता की अयोग्य, हे मी सांगू शकत नाही. हा निर्णय घेण्याचा अधिकार डीपीआर आणि मुख्यमंत्र्यांचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

रामचंद्र राव यांनी मुख्यमंत्र्यांना आपले स्पष्टीकरण सादर केले होते, याची मला कल्पना होती. आपल्या निवृत्तीची पार्श्वभूमी लक्षात घेऊन, निलंबनाच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती त्यांनी केली होती. त्या विनंतीमध्ये त्यांनी संबंधित प्रकरणाचा तपास मात्र सुरूच ठेवावा, असे म्हटले होते. या प्रकरणाचा अंतिम निकाल लागत नाही, तोपर्यंत तपास सुरूच राहील. तपासादरम्यान प्राप्त होणाऱ्या अहवालाच्या आधारेच पुढील निर्णय घेतला जाईल. निवृत्तीनंतरही अनेकदा पेन्शन रोखून धरली गेल्याची उदाहरणे आपण पाहिली आहेत, असेही गृहमंत्र्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news