Karnataka politics | क्रॉस-व्होटिंग : धर्मस्‍थळला जाऊन शपथ घेणार

भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांचा निर्णय; आ. सुरेश कुमार यांचा विरोध
Karnataka politics | क्रॉस-व्होटिंग : धर्मस्‍थळला जाऊन शपथ घेणार
Published on
Updated on

बंगळूर : विधान परिषद निवडणुकीत भाजप आमदारांनी केलेल्या क्रॉस-व्होटिंगमुळे मोठ्या नामुष्कीला सामोरे जाणारे भाजप नेते आता भाजप आमदारांना धर्मस्थळला नेवून शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. यासंदर्भात धर्मस्थळ येथे भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक घेण्याचे ठरले असून, सदर बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.

दरम्यान, आमदारांकडून क्रॉस व्होटिंगबाबत विचारणा करून धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी यांच्यासमोर शपथ घेतली जाणार असल्याचे कळते आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी या विधान परिषद निवडणुकीत भाजप आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांवर केली जात आहे. आमदारांच्या अशा वागणुकीमुळे पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे माझ्यासह ६३ आमदारांवर संशय व्यक्त केला जात आहे. त्‍यामुळे मी स्वत: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना फोन करून माहिती दिली आहे.

दरम्यान, मी व आर. अशोक यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी दिल्लीला जात असून, या आठवड्यात धर्मस्थळ येथे पक्षाची विधिमंडळ बैठक घेण्यावर आर. अशोक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ज्या आमदारांनी पक्षाशी गद्दारी केली, त्यांची ओळख श्रीक्षेत्रातच उघड होऊ द्या. कारण याचा शोध घेणे खूप महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीत आपल्या विरोधात मतदान करणाऱ्या भाजप आमदारांना ओळखण्यासाठी धर्मस्थळात शपथ देण्याच्या भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या निर्णयाला ज्येष्ठ आमदार सुरेश कुमार यांनी आक्षेप घेतला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news