Karnataka school admission: पहिलीला प्रवेशासाठी 60 दिवसांची सवलत

पाच वर्षे 10 महिने पूर्ण झाले तरी पुरेसे
Admission Fraud
Admission FraudPudhari
Published on
Updated on

बंगळूर : येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीला प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या वयोमर्यादेत 60 दिवसांची सूट देण्यात आली आहे. त्यानुसार किमान 5 वर्षे 10 महिने पूर्ण केलेल्या मुलांना पहिलीला प्रवेश घेता येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री मधू बंगाराप्पा यांनी दिली. सध्या ही वयोमर्यादा सहा वर्षे पूर्ण अशी होती. एक दिवस कमी असेल तरीही पहिलीला प्रवेश मिळत नव्हता.

गुरुवारी (दि. 26) विधानसभा अधिवेशनात माहिती देताना बंगारप्पा म्हणाले, अनेक शैक्षणिक संस्थाप्रमुखांनी तसेच पालकांनी राज्य सरकारला इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी असलेली सहा वर्षांची वयोमर्यादा कमी करण्याची विनंती केली होती. त्याचा विचार करून राज्य सरकारने चालू शैक्षणिक वर्षापासून लागू होणारा हा सहा वर्षांचा कालावधी साठ दिवसांनी कमी केला आहे. ही समस्या प्रत्येक वेळी भेडसावत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने नवीन कायदा आणून त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत एलकेजी आणि यूकेजीसाठी कोणताही नियम नव्हता.

आता यासाठी नवीन कायदा आणला जाईल आणि एलकेजी व यूकेजीमधील प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित करून स्पष्टता आणली जाईल. यासंदर्भात पुढील अधिवेशनात विधेयक सादर केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news