Karnataka Child Labour : बंगळूरमध्ये बालमजुरीच्‍या पाशातून ११४ बालकांची सुटका

पोलिसांची विशेष मोहीम; संबंधित मालकांवर गुन्हे दाखल
Child Labour
Child LabourPudhari
Published on
Updated on

बंगळूर : बंगळूर शहरात बालमजुरीविरोधात राबवण्यात आलेल्या एका मोठ्या आणि व्यापक मोहिमेत पोलिसांनी तब्बल ११४ मुलांची सुटका केली आहे. याप्रकरणी बालमजुरांना कामावर ठेवणाऱ्या मालकांना ताब्यात घेण्यात आले असून, संबंधित व्यावसायिक आस्थापनांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या कडक निर्देशानंतर पोलिसांकडून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. बंगळूर शहर पोलिसांनी पूर्व आणि उत्तर-पूर्व विभागांमधील गॅरेज, बाजारपेठा, दुरुस्तीची दुकाने, हॉटेल, बार, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांवर तब्बल ९१७ ठिकाणी छापे टाकून अचानक तपासणी केली. केवळ या भागात ७१ मुलांची सुटका करण्यात आली.

शहराच्या इतर भागांतही समन्वय साधत संयुक्त मोहिमेच्या माध्यमातून एकूण ११४ अल्पवयीन बालकांची मुक्तता करण्यात आली असून त्यांना बालमजुरीच्या पाशातून सोडवण्यात आले आहे. अशा प्रकारे लहान मुलांकडून बेकायदेशीररीत्या काम करून घेणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news