Belgaum Accident: दुचाकी कालव्यात कोसळून तरुण ठार

भरधाव दुचाकी नियंत्रण सुटल्याने पाणी नसलेल्या ठिकाणी कालव्यात पडून तरुण जागीच ठार झाला
Belgaum Accident: दुचाकी कालव्यात कोसळून तरुण ठार
Published on
Updated on

बेळगाव : भरधाव दुचाकी नियंत्रण सुटल्याने पाणी नसलेल्या ठिकाणी कालव्यात पडून तरुण जागीच ठार झाला. बेनकट्टीजवळ (ता. यरगट्टी) बुधवारी (दि. १२) रात्री हा अपघात झाला. कृष्णा लक्ष्मण संपीगेर (वय ३२, रा. मूळ रा. नेसरगी, सध्या रा. मबनूर, ता. यरगट्टी) असे मृताचे नाव आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिका माहिती अशी, कृष्णा हा त्याच्या दुचाकीवरून बेनकट्टीहून मबनूरकडे निघाला होता. या रस्त्याने जाताना मलप्रभा डाव्या कालव्यावरुन जावे लागते. हा रस्ता खूपच अरुंद आहे. येथून भरधाव जाताना त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने तो कालव्यात पडला.

पडताना तो कालव्याच्या काँक्रिटीकरण केलेल्या खांबावर व त्यानंतर पाणी नसलेल्या ठिकाणी दुचाकीसह पडल्याने जागीच ठार झाला. या प्रकरणी त्याची पत्नी शैला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुरगोड पोलिसांत नोंद झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news