Belgaum Accident: यमकनमर्डीचा डॉक्टर अपघातात ठार

मोटो यमकनमर्डीतर्फे आयोजित लडाख यात्रेवेळी झालेल्या अपघातात यमकनमर्डीतील डॉक्टर ठार झाले
Accident
Accidentfile photo
Published on
Updated on

बेळगाव : मोटो यमकनमर्डीतर्फे आयोजित लडाख यात्रेवेळी झालेल्या अपघातात यमकनमर्डीतील डॉक्टर ठार झाले. महाराष्ट्रातील सोलापूरजवळ गुरुवारी (दि. २८) हा अपघात झाला. डॉ. सर्वेश निजप्पा गुरव (वय ४२) असे त्यांचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, मोटो यमकनमर्डीतर्फे सुमारे ७,८०० किलोमीटरच्या लडाख दुचाकी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेसाठी सहभागी झालेला संघ गुरुवारी सकाळी बेळगावहून रवाना झाला होता. प्रवासादरम्यान सोलापूरजवळ डॉ. सर्वेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ती घसरली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news