

राकसकोप : यळेबैलमध्ये (ता. बेळगाव) जगद्गुरु तुकाराम गाथा पारायण सोहळ्याची सांगता गुरुवारी (दि. 15) करण्यात आली. यानिमित्त उभ्या व गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो वारकऱ्यांनी या सोहळ्यचा अनुभव घेतला.
गावात शुक्रवारपासून (दि. 9) पारायण सोहळा सुरू होता. त्याची सांगता गुरुवारी करण्यात आली. महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते अश्वांचे पूजन करण्यात आले. यावेळी तुकाराम महाराज यांचे वंशज पुंडलिकमहाराज देहूकर यांचे काला कीर्तन झाले. देहूकर यांचा सत्कार मंत्री हेब्बाळकर यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष महेश पाटील, पारायण मंडळ अध्यक्ष बाळू पाटील, उपाध्यक्ष विठ्ठल ओऊळकर आदींसह गावकरी, ग्रा. पं. सदस्य उपस्थित होते. यावेळी वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव परिसरासह चंदगड, गोवा परिसरातील भजनी मंडळांनी सहभाग दर्शविला होता. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.