Belgaum fraud case: महिला पीडीओची पाच लाखांची फसवणूक

व्हॉट्स ॲपवर आलेली एपीके फाईल ओपन केल्यानंतर महिलेच्या खात्यातील पाच लाख 16 हजाराची रक्कम गायब झाली.
Fraud Case
Fraud CasePudhari
Published on
Updated on

बेळगाव : व्हॉट्स ॲपवर आलेली एपीके फाईल ओपन केल्यानंतर महिलेच्या खात्यातील पाच लाख 16 हजाराची रक्कम गायब झाली. ऑनलाईन भामट्यांनी ती आपल्या खात्यावर वर्ग करुन घेतली. 2 एप्रिल रोजी घडलेल्या या प्रकरणाची बुधवारी (दि. 8) रात्री शहर सीईएन पोलिसात नोंद झाली आहे. सदर महिला बेळगाव तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या पीडीएफ म्हणून काम करतात.

शहरातील विद्यानगर येथे राहणाऱ्या 50 वर्षीय महिलेच्या व्हॉट्स ॲपवर 2 रोजी एक एपीके फाईल आली. त्यांनी अनावधानाने ती डाउनलोड केली. यानंतर काही वेळातच त्यांच्या कॅनरा बँकेत असलेल्या खात्यावरील टप्प्याटप्प्याने पाच लाखाची रक्कम गायब झाली. त्यांना याचे मेसेज आले, परंतु, ते बंद कसे करायचे हे कळेपर्यंत त्यांचे पूर्ण खाते रिक्त झाले होते. बुधवारी त्यांनी शहर सीईएन पोलिसात फिर्याद दिली असून याची नोंद करून घेतली आहे. पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news