Belgaum Murder : भूखंड खरेदी वादातून वडगावात विवाहितेचा खून

गळा आवळून किंवा साडीच्या साहाय्याने बेडरूममधील पंख्याला लटकवून खून केल्याचा संशय
Belgaum Murder : भूखंड खरेदी वादातून वडगावात विवाहितेचा खून
Published on: 
Updated on: 

बेळगाव : एका ३६ वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३०) पहाटे वडगावमधील आनंदनगर परिसरात उघडकीस आली आहे. पूनम अमित डेळेकर (वय ३६, रा. आनंदनगर, दुसरा क्रॉस, वडगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.

भूखंड खरेदीच्या आर्थिक व्यवहारावरून झालेल्या वादातून तिचा गळा आवळून किंवा साडीच्या साहाय्याने बेडरूममधील पंख्याला लटकवून खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी रंजन मरवे (रा. रयत गल्ली, वडगाव) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत महिलेचे वडील अनंत पाटील (वय ६४, रा. बिच्चू गल्ली, शहापूर) यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, गुरुवारी (दि. २९) रात्री ९.३० ते गुरुवारी पहाटे २.३० या कालावधीत आनंदनगरमधील घरात ही घटना घडली. भूखंड खरेदीच्या व्यवहारावरून तसेच वैयक्तिक कारणातून रंजन आणि पूनम यांच्यात वाद झाला होता. या वादातून तिचा गळा आवळून अथवा साडीने पंख्याला लटकवून ठार मारल्याची तक्रार आहे. शहापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३५२ आणि ३५१(३) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.