Belgaum Jewellery Theft: महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास

मंदिराकडे जाताना बसस्थानकातील घटना
Belgaum Jewellery Theft
Belgaum Jewellery Theft: महिलेच्या गळ्यातील दागिने लंपास
Published on
Updated on

बेळगाव : बसस्थानकात बसमध्ये चढताना महिलेच्या गळ्यातील सुमारे ५.५० लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना बुधवारी (दि. २६) बैलहोंगलमध्ये घडली. मंगला बसय्या देसाई (वय ३५, रा. ननगुंडीकोप्प) यांच्या गळ्यातील दागिने लांबवण्यात आले आहेत.

मंगला नगुंडीकोप्प येथून बैलहोंगल बसस्थानकात आल्यानंतर मुरकुंबीतील चामुंडेश्वरी मंदिराकडे जाण्यासाठी बैलहोंगल-यरगट्टी बसमध्ये चढल्या. काही वेळातच त्यांच्या गळ्यातील सुमारे ३.५ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी तत्काळ प्रवाशांसह बस पोलिस ठाण्यात आणून तपासणी केली. बसमधील ८० हून अधिक प्रवाशांची तपासणी करण्यात आली. मात्र, चोरीचे दागिने सापडले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरु केला असून बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली जात आहे. या प्रकरणी बैलहोंगल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news