Belgaum woman death: विषारी प्राण्याच्या दंशाने महिलेचा मृत्यू

शेतात काम करत असताना विषारी प्राण्याच्या दंशामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) हुक्केरी तालुक्यातील शट्टीहळ्ळीत घडली
death
death file photo
Published on
Updated on

बेळगाव : शेतात काम करत असताना विषारी प्राण्याच्या दंशामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. १९) हुक्केरी तालुक्यातील शट्टीहळ्ळीत घडली. शांता कृष्णा कवळीकट्टी (वय ५१, रा. शट्टीहळ्ळी, ता. हुक्केरी) असे मृत महिलेचे नाव आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, शांता कवळीकट्टी या शेतात काम करत असताना त्यांना अज्ञात विषारी प्राण्याने दंश केला. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोचण्यापूर्वीच वाटेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस ठाण्यात करण्यात आली असून नेमक्या कोणत्या विषारी प्राण्याच्या दंशामुळे त्यांचा मृत्यू झाला याबाबत अधिक तपास सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news