Belgaum Crime: वन्यजीव अवयवांची तस्करी; दोघांना अटक

शिर्सी वन गस्त पथकाची कारवाई : कारवारसह गोव्यात शिकारीचा संशय
Belgaum Crime
Belgaum Crime: वन्यजीव अवयवांची तस्करी; दोघांना अटकPudhari
Published on
Updated on

खानापूर : शिर्सी (जि. कारवार) वन गस्त पथकाने (एफएमएस) तालुक्याच्या उप्पळेश्वर गावात अवैधपणे वन्यजीव अवयव बाळगणाऱ्या आणि त्यांची वाहतूक करणाऱ्या दोघा संशयितांना अटक केली आहे. संशयित गोवा आणि कारवार जिल्ह्यातील वन तस्करी व शिकारीच्या घटनांमध्ये सक्रिय असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा टाकून एफएमएस पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात वन्यजीव उत्पादने आढळून आली असून ती जप्त केली आहेत. त्यात १५.७४८ किलो खवले कवच, गव्याची दोन शिंगे, वाघांची आठ नखे व दोन दात, बिबट्यांची १२ नखे व तीन दात, रानडुकरांचे सहा दात, एक दुचाकी व एक मोपेडचा समावेश आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या उत्पादनांचा स्रोत आणि वाहतूक जाळ्याचा तपास सुरु आहे. इतर संशयित फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. ही कारवाई एपीसीसीएफ मनोज त्रिपाठी, डीसीएफ संदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली एसीएफ राघवेंद्र नाईक, आरएफओ शिल्पा नाईक आणि शिर्सी एफएमएसने ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news