Belgaum Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखीचा मृत्यू

भेंडीगिरी-हिरेबागेवाडी मार्गावर रविवारी (दि. १९) हा अपघात झाला
Accident
Accident Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अनोळखी तरुणाचा मृत्यू झाल्याची नोंद हिरेबागेवाडी पोलिसांत झाली आहे. भेंडीगिरी-हिरेबागेवाडी मार्गावर रविवारी (दि. १९) हा अपघात झाला होता.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास सदर अनोळखी तरुण रस्ता ओलांडत असताना भेंडीगिरीहून हिरेबागेवाडीकडे निघालेल्या अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये सदर तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचाराचा उपयोग न होता सायंकाळी सहाच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी हिट अँड रन गुन्ह्याची नोंद करुन घेत तपास सुरु केला आहे. सदर तरुणाचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे आहे. त्याची उंची ५.४ फूट, अंगाने सडपातळ, गव्हाळ रंग, गोल चेहरा असून डोकीवर काळे केस आहेत. त्याच्या अंगावर काळ्या व लाल रंगाचा चौकडा शर्ट, काळी जीन्स आहे.

या तरुणाबाबत कुणाला माहिती असल्यास त्यांनी हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याशी ०८३१-२४०५२८० वा उपनिरीक्षक अविनाश ९६११७०४१४३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news