Belgaum Crime: बेळगावातील युनियन जिमखान्याजवळ गोळीबार

जुगारातील वर्चस्ववादातून घटना घडल्याचा संशय
firing
firingpudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : शहरातील कॅम्प परिसरातील युनियन जिमखान्याजवळ मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार पोलिसांनी हा हवेत गोळीबार असल्याचे सांगत असले तरी बेकायदेशीर जुगारातील वर्चस्व वादातून हा गोळीबार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रफुल्ल नामक तरुणाने हा गोळीबार केला असून त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.

प्रफुल्लने आधी येथे जुगार बसवणाऱ्या व्यक्तीवर निशाणा साधत पहिली गोळी झाडली. परंतु ती त्याने चुकवली यानंतर त्याने जिमखाना पटांगणावर येऊन दोन गोळ्या हवेत झाडल्या व येथून फरारी झाला.विशेष म्हणजे गोळीबार झालेला हा परिसर पोलीस आयुक्तालयापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर आहे.

युनियन जिमखान्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून क्लब चालतो. रिकरींग क्लब असे याला गोंडस नाव दिले असले तरी येथे तीन पत्त्यांचा डाव चालत असल्याचा संशय आधीपासून व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी नारायण बरमनी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. युनियन जिमखाना येथे रिकरिंग क्लब चालवण्याच्या नावाखाली जुगार सुरू असल्याची चर्चा यापूर्वी होती. परंतु येथे कधीही कारवाई झाली नव्हती.

शहरातीलच एकाने गेल्या काही दिवसांपासून हा क्लब चालवण्यासाठी घेतला होता. शहर व तालुका परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर जुगार चालतो. परंतु, युनियन जिमखान्यावर सुरू असलेल्या क्लबनंतर अन्य ठिकाणचा बेकायदेशीर जुगार व्यवस्थित चालत नव्हता. याच रागातून प्रफुल्ल याने गोळीबार केल्याचा संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news