Belgaum Theft: दागिने चोरणार्‍या दोन महिलांना अटक

सात लाखांचे दागिने जप्‍त : अथणी पोलिसांची कारवाई
Belgaum Theft: दागिने चोरणार्‍या दोन महिलांना अटक
Published on
Updated on

अथणी : दागिने चोरणार्‍या कोल्‍हापूर येथील दोन महिलांना अथणी पोलिसांनी अटक करून त्‍यांच्‍याकडून 6,80,000 किमतीचे ४२.५ ग्रॅम दागिने जप्‍त केले. हेमा धर्मेंद्र कसबेकर व निलम विजय कांबळे अशी अटक केलेल्‍या महिलांची नावे आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी नंदगाव (ता. अथणी) येथील पुतळव्‍वा कांबळे या बाजार करून बसने घरी जात होत्‍या. यावेळी चोरट्यांनी त्‍यांची सात ग्रॅमची बोरमाळ लंपास केली. याबाबत पुतळव्‍वा यांनी अथणी पोलिसांत फिर्याद दिली होती. २३ मार्च रोजी ही घटना घडली होती. याप्रकरणी अथणी पोलिसांनी तपास हाती घेतला होता. पोलिसांनी १6 मे रोजी कोल्‍हापूर शहरातील हेमा कसबेकर व निलम कांबळे यांना अटक केली. पोलिसांनी त्‍यांची चौकशी केली असता त्‍यांनी चोरी केल्‍याची कबुली दिली. पोलिसांनी त्‍यांच्‍याकडून विविध चार प्रकरणातील 42.5 ग्रॅम सोन्‍याचे दागिने (6,80,000 रूपये) जप्त केले.

जिल्हा पोलिस प्रमुख के. रामराजन यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त पोलिस प्रमुख आर. बी. बसर्गी, डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआय संतोष हळ्‍ळूर, पीएसआय मल्‍लिकार्जुन उप्‍पार, गुन्हा विभाग पीएसआय मल्लिकार्जुन तळवार यांनी तपास करून कारवाई केली. या तपास पथकात पोलिस कर्मचारी ए. ए. इराकर, श्रीमती जे. आर. असोडे, महांतेश पाटील, ए. बी. होसाळकर, एम. एम. कोटा, व्ही. व्ही. गायकवाड, एस. एस. सनादी, जे. एच. डांगे यांचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news