Belgaum Car Theft: चोरीच्या २९ लाखांच्या दोन कार जप्त

चोरीच्या दोन कार शोधून त्या जप्त करण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले
Belgaum Car Theft: चोरीच्या २९ लाखांच्या दोन कार जप्त
Published on
Updated on

बेळगाव : चोरीच्या दोन कार शोधून त्या जप्त करण्यात एपीएमसी पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही कारची किंमत २९ लाख रुपये आहे. एक कार बेळगावातून तर दुसरी धारवाडमधून चोरीला गेल्याची नोंद आहे.

१० मे रोजी हनुमाननगर येथील कार चोरीला गेल्याची फिर्याद प्रियांका आजरेकर यांनी एपीएमसी पोलिासंत दिली होती. त्यानुसार पोलिसांकडून शोध सुरु होता. त्याचा शोध घेताना एपीएमसी पोलिस मुंबईला पोचले. या ठिकाणी चोरीच्या दोन कार सापडल्या. त्यात किया सेल्टोस व दुसरी ह्युंदाई क्रेटा कारचा समावेश आहे. या दोन्ही कार जप्त केल्या आहेत. यापैकी एका कारची किंमत १४ लाख तर दुसऱ्या कारची १५ लाख रुपये किंमत होते.

एफआयआर झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी कारचा शोध लावल्याने एपीएमसी पोलिसांचे आयुक्त भूषण बोरसे यांनी कौतुक केले आहे. निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी याचा शोध घेतला.  

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news