Belgaum Cyber Fraud : वृद्धेसह दोघांची १९ लाखांची फसवणूक

वृद्धेला डिजिटल अरेस्टची भीती; एकाला एपीके चलन पाठवून लूट
Cyber fraud
Cyber fraud File Photo.
Published on
Updated on

बेळगाव : डिजिटल अरेस्टची भिती दाखवत शहरातील एका वृद्धेची १६ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. तर दुसऱ्या एका घटनेत कोतवाल गल्लीतील एकाला आरटीओ चलनाची एपीके फाईल पाठवून खात्यावरील २ लाख ९० हजार रुपये काढून घेतले. या दोन्ही घटनांची शहर सीईएनमध्ये नोंद झाली आहे.

महांतेशनगरमधील लता नामक ६६ वर्षीय वृद्धेला ऑगस्ट महिन्यात एका अनोळखी क्रमांकावरुन व्हिडीओ काल आला. समोरच्याने तुमचे आधारकार्ड अडीच लाख रुपये घेऊन दहशतवाद्यांना विकले आहे. आम्ही संबंधीत दहशतवाद्याला अटक केली असून त्याच्याकडे तुमचे आधारकार्ड मिळाले असल्याचे व्हिडीओ कॉलवरून दाखवले. त्यामुळे तुम्हाला अटक करावी लागेल, अशी भीती दाखवली. वृद्धेला घाबरवल्यानंतर तिच्याकडून बँक खात्याचा तपशील मागून घेतला. शिवाय तुमच्या बँक खात्यातील रक्कम आम्ही सांगतो त्या खात्यावर वर्ग करा, तरच तुमची या प्रकरणातून सुटका होईल, असे सांगितले.

घाबरलेल्या वृद्धेने ते सांगतील तसे केले. भामट्यांनी २१ ऑगस्ट रोजी या वृद्धेच्या बँक खात्यावरील ९ लाख रुपये काढून घेतले. यानंतर पुन्हा १७ सप्टेंबर रोजी फोन करून ७ लाख रुपये वर्ग करुन घेतले. ऑनलाईन भामटे सातत्याने फोन करू लागल्याने वृद्धेला संशय आला. त्यानंतर त्यांनी आपण फसलो गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोमवारी (दि. २१) शहर सीईएनमध्ये जाऊन याबाबतची फिर्याद दाखल केली.

एपीके फाईलद्वारे फसवणूक

शहर सीईएनमध्ये सोमवारी आणखी एका प्रकरणाची नोंद झाली आहे. कोतवाल गल्लीतील महंमदझाकरिया नामक ४५ वर्षीय व्यक्तीचा मित्र जुबेर खाजी याचे व्हॉटस्ॲप अकाऊंट ऑनलाईन भामट्यांनी हॅक केले होते. त्यावरून त्यांनी महंमद यांना आरटीओ चलन भरण्याचे आहे, अशा आशयाची एपीके फाईल पाठवली. त्यांनी ती डाउनलोड करताच त्यांच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरुन भामट्यांनी २ लाख ९० हजार रुपये वर्ग करून घेतले.या दोन्ही घटनांचा तपास पोलिस निरीक्षक श्रीशैल गाबी करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news