Belgaum motorcycle theft: दोन दुचाकी चोर जेरबंद

दोन मोटारसायकलींसह इंजिने जप्त
Belgaum motorcycle theft
अंकलगी : जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलिस अधिकारीPudhari
Published on
Updated on

बेळगाव : दुचाकी चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन मोटारसायकली आणि दोन मोटारसायकल इंजिने असा एकूण १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंकलगी पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल होता.

या प्रकरणाचा तपास सुरू करत असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे २३ मे रोजी छापा टाकून परशुराम उर्फ परसू यल्लाप्पा हनबरहट्टी (वय २२) आणि ईरप्पा तमान्ना मल्लनावर (वय २८ दोघेही रा. कुंदरगी, ता. गोकाक) यांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली.

आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात हिडकल धरण परिसरातून चोरीस गेलेली हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, होळेव्वा मंदिराजवळून चोरीस गेलेली हिरो मोटारसायकल तसेच दोन गुन्ह्यातील मोटारसायकलींची इंजिने यांचा समावेश आहे. गोकाक उपविभागाचे डीवायएसपी रवी डी. नाईक, पोलीस निरीक्षक आर. बी. सुरेशबाबू यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी पोलीस उपनिरीक्षक यमनप्पा मांग आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news