Tilari Ghat Accident : अपघातग्रस्त कारकडे जाणाऱ्या कारलाही अपघात!

बेळगावच्या दोन कारना तिलारी घाटात विचित्र अपघात
Tilari Ghat Accident
Tilari Ghat Accident
Published on
Updated on

चंदगड : तिलारी घाटात दोन विचित्र अपघात होऊन दोन कारचे नुकसान झाले आहे. पहिल्या कारला अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांच्या मदतीला निघालेल्या लोकांच्या कारचाही अपघात झाला. दोन्ही कारमधील प्रवासी किरकोळ जखमी आहेत.

बेळगावच्या दोन्ही कार गुरुवारी दुपारी तिलारी घाटातून गोव्याकडे जात होत्या. पैकी मागे असणारी एक कार कोदाळीच्या पुढे एक किमी अंतरावर वळणावर पलटी होऊन शेतात पडली. ही घटना पुढे गेलेल्या कारमधील नातेवाईकांना समजली. त्यांनी कार माघारी फिरवली आणि ते अपघातग्रस्त कारकडे जात असताना त्या कारलाही अपघात घडला.

ही दुसरी कार तिलारी कॅनॉलजवळ रस्त्याच्या बाजूला मोरीच्या भिंतीवर चढली. सुदैवाने दोन्ही कारमधील प्रवासी सुखरूप आहेत. सायंकाळी उशिरा क्रेनच्या सहाय्याने दोन्ही कार काढून बेळगाव येथे नेण्यात आल्याचे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news