

बेळगाव : तिघांकडून १ किलो १०० ग्रॅम गांजा जप्त करून त्यांना अटक केली. सीसीबी पोलिसांनी ही कारवाई केली.
यातील चौथा संशयित फरारी असून त्याचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये अक्षयकुमार सोमशेखर अंकलगी (वय २०, रा. गुरूवार पेठ, कित्तूर), आदर्श इरय्या हिरेमठ (वय २५, रा. सोमवार पेठ, कित्तूर) व मणीकंठ राचय्या उगरखोड (वय २०, रा. गुरूवार पेठ, कित्तूर) यांचा समावेश आहे.
यातील चौथा संशयित मैताब (रा. बेळगाव) याच्याकडून त्यांनी गांजा घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या गांजाची किंमत ५५ हजार रूपये होते. सीसीबी पोलिस निरीक्षक मंजुनाथ नाईक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.