Belgaum Ganja Seizure : लाखाच्या गांजासह तिघांना अटक

ऑटोनगरात कारवाई : तिघेही संशयित हुक्केरी तालुक्यातील
Belgaum Ganja Seizure : लाखाच्या गांजासह तिघांना अटक
Published on: 
Updated on: 

बेळगाव : हुक्केरीहून बेळगावात गांजा आणून विकणाऱ्या तिघांकडून १ लाख ५ हजार रूपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सीसीबी पोलिसांनी ऑटोनगर येथील लक्ष्मी सॉ मीलजवळ ही कारवाई केली. अटक केलेले तिघेही संशयित हुक्केरी तालुक्यातील आहेत.

शिवानंद ऊर्फ परशा सुक्कन्नवर (वय २३ रा. परकनट्टी), नागराज रामचंद्र भोवीवड्डर (वय २४, रा. सुबय्या कॅम्प हिडकल डॅम) व लखन केंपान्ना काटाबळी (वय २६, रा. चिलभावी, हिडकल डॅम, ता. हुक्केरी) अशी संशयितांची नावे आहेत.

उपरोक्त तिघे हुक्केरी तालुक्यातून गांजा आणून बेळगाव परिसरात विक्री करण्याचा प्रयत्न करत होते. हे सर्वजण ऑटोनगर औद्योगिक परिसरातील लक्ष्मी सॉ मिलजवळ असल्याची माहिती सीसीबीचे निरीक्षक मंजुनाथ नाईक यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसह जाऊन छापा टाकत तिघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून १ लाख ५ हजार रू. किंमतीता २ किलो १२० ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी माळमारुती पोलिसांत नोंद झाली असून पुढील तपास निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांच्याकडून सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.