Belgaum Accident : रोड रोलरखाली सापडून सुपरवायझर ठार

उतारावर उभा असलेला रोडरोलर अचानक मागे सरकल्याने त्‍याखाली सापडून सुपरवायझर ठार झाला
 Accident News
Accident News pudhari photo
Published on
Updated on

बेळगाव : बैलहोंगलमध्‍ये राज्य महामार्गाचे काम सुरू असताना उतारावर उभा असलेला रोडरोलर अचानक मागे सरकल्याने त्‍याखाली सापडून सुपरवायझर ठार झाला. पांडुरंग मधुसूदन (वय ५२, रा. बसवण बागेवाडी) असे त्‍यांचे नाव आहे.

पांडुरंग मधुसूदन हे अशोका कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. हिरेबागेवाडी ते सौंदत्ती दरम्यान राज्य महामार्गाच्या रस्ताचे काम सुरू असून, त्यावेळी ते कामाची पाहणी करत होते. उतारावर उभा असलेला रोड रोलर अचानक नियंत्रण सुटून मागे सरकल्याने पांडुरंग यांच्या अंगावरून गेला. यामध्‍ये त्‍यांचा जागीच मृत्यू झाला.

बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी बैलहोंगल पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news