Drowning Death: दहावी उत्तीर्ण झाला, पण विहिरीत बुडाला

दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या विद्यार्थी विहिरीत बुडाला
Drowning death
Drowning deathPudhari
Published on
Updated on

बेळगाव : दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या विद्यार्थी विहिरीत बुडाला. कोलार जिल्ह्यातील मूळबागिलू तालुक्यातल्या सोनवाडी येथे ही घटना घडली. किरण (15) असे त्या विद्यार्थ्याचे नाव आहे. गुरूवारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये किरण उत्तीर्ण झाला. त्यामुळे त्याला मोठा आनंद झाला होता. याच आनंदात तो मित्रांसोबत गावाजवळील विहिरीत पोहायला गेला होता.

मित्रांसोबत विहिरीत उतरलेल्या किरणला विहिरीच्या खोलीची कल्पना नव्हती. पोहताना तो विहिरीत बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी घाबरून आरडाओरडा करताच स्थानिक लोक धावत आले. अग्निशामक दलाला तात्काळ कळवण्यात आले. अग्निशामकचे जवानांकडून विहिरीत शोधमोहीम राबवण्यात येत आहे. किरण दहावी परीक्षेत 38.24 टक्के गुणांसह उत्तीर्ण झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news