Belgaum Bus Service: गणेशोत्सवासाठी बंगळूरहून बेळगाव मार्गावर विशेष बससेवा

प्रवाशांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी नियोजन
Karnataka bus service
Karnataka bus service
Published on
Updated on

बेळगाव : गौरी-गणेशोत्सवानिमित्त सलग तीन दिवस सुट्टी असल्याने बेळगाव मार्गावर प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ ते १३ सप्टेंबरदरम्यान बंगळूरच्या केम्पेगौडा बस स्थानकाहून बेळगाव, पुणे आणि मुंबईला विशेष बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

परिवहनच्या विभागीय नियंत्रकांनी दिलेल्या माहितीनुसार सणानंतर बंगळूर, पुणे आणि मुंबई या शहरांकडे परतणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नंतरही विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच गर्दीच्या काळात नियमित बससेवेवर अतिरिक्त ताण येऊ नये. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news