

बेळगाव : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कत्तलीसाठी आणलेल्या गायींची शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी कित्तूर येथे सुटका करण्यात आली. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कित्तूर पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखान्यावर छापा टाकून तब्बल ४७ गायींची सुटका केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी सकाळी सुमारे ९ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. काही व्यावसायिकांनी बकरी ईदनिमित्त गायी कत्तलीसाठी आणल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून संबंधित ठिकाणाची माहिती दिली.
यानंतर पोलिस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे छापा टाकत कत्तलीसाठी ठेवण्यात आलेल्या गायी ताब्यात घेतल्या. कारवाईदरम्यान सुमारे दहा गायी पोलिसांनी ताब्यात घेतलया असून उर्वरित ४७ गायींची सुटका करून त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.